Adarsh Sahakari Rughnalay Aurangabad Best Hospital

सक्षम आणि निरोगी समाजासाठी सेवेत...!    प्रभावी उपचारांसह तत्पर रुग्णसेवेस सज्ज...!

आमच्याविषयी अधिक माहिती जाणून घ्या...

महात्मा गांधी म्हणत, ``कोणत्याही देशाची संपन्नता ही त्या देशात किती लोक अब्जाधीश आहेत यावरून ठरत नाही, तर त्या देशात कुपोषित, दारिद्रयरेषेखाली जगणार्‍या लोकांची संख्या किती अल्प आहे, यावरून ठरते. देशातील कुपोषण, दारिद्रय निर्मूलन करून अशा लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकार तत्त्वांचा वापर करणे आवश्यक आहे...`` महात्मा गांधी यांच्या विचारांना स्मरूनच आम्ही आजपर्यंत सहकार क्षेत्रात कार्यरत राहिलो. ‘आदर्श समूह’ स्थापन करून या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना साहाय्य करण्याचा प्रयत्न केला. त्या दिशेने आमचे प्रयत्न प्रामाणिक असल्याने आम्हाला त्यात यशही मिळत गेले. या यशाच्या मातीतच आम्ही नवनव्या स्वप्नांची पेरणी केली.

आमची ही स्वप्ने साकारही झाली. भव्य, सुसज्ज अशा सहकारी रुग्णालयाची स्थापना करावी, हे स्वप्नही त्यातलेच! ‘आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या., औरंगाबाद’ या नावाने आमचे हे स्वप्न आता साकार होत आहे, असे सांगताना आम्हाला खूप आनंद वाटतो. माझ्या बंधू-भगिनींनो… या क्षेत्रातील आजपर्यंतच्या वाटचालीत आपण सर्वांनी मला चांगली साथ दिली. प्रत्येक महत्कार्यात आपण माझ्यासोबत होतात. त्यामुळेच मी सहकार क्षेत्रात ‘आदर्श’ असे कार्य करू शकलो.

5000
50
47
30
Patients Testimonials

रुग्णांची मते

अत्याधुनिक आणि प्रभावी आरोग्य सेवेचा अनुभव घेण्यासाठी आजच आमच्या रुग्णालयाला भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा.
TOP