Adarsh Sahakari Rughnalay Aurangabad Best Hospital

आम्हाला चांगले जाणून घ्या

आमचे ध्येय

समाजातील आरोग्याचा स्तर उंचावून प्रत्येक घटकास उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणे, हे आमचे ध्येय आहे. आमच्या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या सेवेत आणि उपचारात कुठलीही तडजोड न करता, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना सर्वोच्च गुणवत्तेची आरोग्य सेवा पुरविण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. त्याचबरोबर आरोग्य क्षेत्रातील विज्ञान-तंत्रज्ञानाला अनुसरून वैद्यकीय संशोधनातून रुग्णांवरील परिणामकारक उपचारांसाठी आम्ही तत्परतेने सज्ज आहोत.

आमची दूरदृष्टी

मराठवाड्यातील शहरी भागात अत्याधुनिक रुग्णालयांची संख्या मोठी असल्याने, तेथील नागरिकांना उत्कृष्ट आरोग्य सेवा उपलब्ध असतात. त्या तुलनेत ग्रामीण भागातील चित्र उलट दिसते. ग्रामीण भागात वसलेल्या समाजातील प्रत्येक घटकाला अत्याधुनिक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देऊन, त्याच परिसरात चांगले उपचार तेही किफायतशीर दरात मिळावेत, हा आमचा मानस आहे. समाजातील वंचित आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांपर्यंत विविध आरोग्यदायी योजना पोहचविणे.

आमच्या हॉस्पिटल बद्दल

औरंगाबाद जिल्ह्यात ठिकठिकाणी शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालये तसेच खासगी रुग्णालयेही आहेत. तरीही रुग्ण शहरात उपचारासाठी घाटी किंवा खासगी रुग्णालयात धाव घेतात. त्यांना उपचारासोबतच प्रवास, निवास, भोजन आदींचा मोठा खर्च लागतो.

रुग्णासोबतच्या महिला, मुले आणि वृद्ध नातेवाइकांची गैरसोय होते. त्यांना आपल्या गावात किंवा गावा जवळचं चांगल्या आरोग्य सुविधा मिळाल्या तर त्यांचा त्रास वाचेल, शिवाय घाटीवरील ताणही कमी होईल, या विचाराने आदर्श उद्योग समूहाचे अध्यक्ष सहकारत्न मा. अंबादास मानकापे दादा यांनी सहकारी तत्त्वावरील रुग्णालय सुरू करण्याची योजना आखली. आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्यादित, औरंगाबाद या सहकारी संस्थेची स्थापना केली. या अंतर्गत दोन सहकारी रुग्णालये सुरू करण्यात आले आहे.

मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील तिसरे सहकारी रुग्णालय होण्याचा मान आदर्श रुग्णालयाला मिळाला आहे. आदर्श रुग्णालय आणि संशोधन केंद्राची स्थापना २० आक्टोंबर २०१८ साली आदर्श समूहा अंतर्गत करण्यात आली.

रुग्णालयाच्या संचालक मंडळात २१ सदस्य आहेत. यात ५० टक्के डॉक्टर तर उर्वरित ५० टक्के ग्रामस्थ आणि आदर्श ग्रुपच्या संचालकांचा समावेश आहे. रुग्णालयाचे प्रशासन, नियुक्त्या, उपचाराचे दर आदी हे संचालक मंडळ ठरवेल. यामुळे अव्वाच्या सव्वा दर आकारता येणार नाहीत.

adarsh-sahakari-hospital delux-room-adarsh-hospital-top-hospital-in-aurangabad manager-cabin-adarsh-hospital conference-hall-adarsh-hospital patient-lift-adarsh-hospital-with-all-facilities

अध्यक्षांचा संदेश

mankape-dada-chairman-of-adarsh-group-of-companies

अंबादासराव मानकापे पाटील,
आदर्श उद्योग समूह, औरंगाबाद.

‘कोणत्याही देशाची संपन्नता ही त्या देशात किती अब्जाधीश लोक आहेत यावरून ठरत नाही तर त्या देशात कुपोषित, दारिद्रयरेषेखाली जगणार्‍या लोकांची संख्या किती कमी आहे यावरून ठरते. त्यासाठी अशा लोकांची संख्या कमीत कमी राखणे व त्यासाठी सहकार तत्त्वांचा वापर करणे आवश्यक आहे.’ हे विचार आहेत महात्मा गांधी यांचे. या विचारांना स्मरूनच आम्ही आजपर्यंत सहकार क्षेत्रात कार्यरत राहिलो. ‘आदर्श समूह’ स्थापन करून या माध्यमातून समाजातील उपेक्षित घटकांना सहाय्य करण्याचा प्रयत्न केला. आमचे प्रयत्न प्रामाणिक असल्याने आम्हाला त्यात यशही मिळत गेले. या यशाच्या मातीतच आम्ही नवनव्या स्वप्नांची पेरणी केली. भव्य, सुसज्ज अशा सहकारी रुग्णालयाची स्थापना करावी, हेही एक त्यापैकीच एक स्वप्न! सांगण्यास आनंद वाटतो की, हेच स्वप्न ‘आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या., औरंगाबाद’ या नावारुपाने आता साकार होत आहे.

बंधू-भगिनींनो…आजपर्यंतच्या वाटचालीत आपण सर्वांनी माझी साथसंगत केली. त्यामुळेच मी सहकारात ‘आदर्श’ असे कार्य करु शकलो. या कार्याची सरकारने आणि सहकार समाजानेही दखल घेतली. मला ‘सहकाररत्न’ म्हणून गौरविण्यात आले. अर्थातच माझ्यावरील जबाबदारी वाढली आणि मग मी सहकार क्षेत्रात उदात्त, विधायक कार्य करण्यासाठी पुनःपुन्हा सज्ज झालो. वय वाढत असताना सहकार समृद्ध करण्यासाठी झुंजत, झगडत राहिलो. तसेही आपल्याकडे झुंजल्याशिवाय, झगडल्याशिवाय कधीच काही मिळत नाही. अर्थात मला माझ्यासाठी म्हणून काही मिळवायचे नव्हतेच! मिळवायचे होते ते समाजातील गोरगरिबांसाठी! रंजल्या गांजल्यांसाठी!!

समाजातील गोरगरिबांना आरोग्यसेवा देता यावी आणि त्यासाठीच सहकारी रुग्णालयास परवानगी मिळाली, ही माझी कळकळीची मागणी होती. उशिरा का होईना, पण त्या माझ्या मागणीला सरकारकडून सकारात्मक

प्रतिसाद मिळाला. त्यामुळेच मी आणि माझ्या सहकार्‍यांनी ‘आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या., औरंगाबाद’ ची नोंदणी करून पुढचे पाऊल उचलले. बंधू-भगिनींनो…प्रश्‍न सहकारी संस्था स्थापन्याचा असतोच; पण त्यापेक्षा अधिक जिकीरीचा प्रश्‍न असतो तो स्थापन केलेली संस्था उत्तम प्रकारे चालविण्याचा! आपल्याला ‘आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या., औरंगाबाद’च्या माध्यमातून खरोखरच चांगला, आदर्श असा कारभार करायचा आहे; समाजातील उपेक्षित घटकांना, गोरगरिबांना मोफत नाही; पण अगदीच माफक दरात आधुनिक आरोग्यसेवा द्यायची आहे. अशी सेवा देण्यासाठी आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सज्ज असून ते उपलब्ध सुसज्ज, आधुनिक यंत्रणेद्वारे आपले कार्य तत्परतेने पार पाडतील. आरोग्यसेवा हीच ईश्‍वरीसेवा समजून ते आपले कार्य करतील. शेवटी सहकारी रुग्णालय स्थापन्याची कल्पना ही जनकल्याणाच्या कळवळ्यातूनच अंकुरलेली आहे. तेव्हा आपण सर्वांनी या कल्पनेचा अंकुर वाढवायचा आहे; प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदान देऊन, सहकार्य करून सहकारी रुग्णालयाचा वेल गगनाला भिडवायचा आहे! अडचणी आहेतच; आपणा सर्वांच्या सहकार्याने, सहयोगाने या अडचणीवर नक्कीच मात करता येईल, याची मला खात्री आहे. शेवटी सहकारमहर्षी वैकुंठभाई मेहता यांनी म्हटल्याप्रमाणे- ‘सहकार सहजीवनाचा आत्मा आहे व सहजीवन मानवी जीवनाचा आत्मा आहे.’ तेव्हा आपण सर्वांनी सहजीवनातून ‘आदर्श सहकारी रुग्णालय व संशोधन केंद्र मर्या., औरंगाबाद’ या संस्थेच्या माध्यमातून अतुलनीय असे जनसेवेचे कार्य करुया! त्यासाठीच संवेदनशील दाते, समूह, संस्था-संघटनांनी भागभांडवल उभारणीच्या कामात पुढे यावे; सहकारी रुग्णालयरुपी जगन्नाथाचा रथ पुढे नेण्यासाठी सर्वानी सक्रिय सहभाग नोंदवावा, ही नम्र विनंती.उपाध्यक्षांचा संदेश

मित्रहो…
‘आरोग्यं धनसंपदा’ असे आपण म्हणतो. त्या पार्श्‍वभूमीवर स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो; पण रोग काही सांगून येत नाही. त्यात काळ बदलताना नवनव्या रोगांची उत्पती होत आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राला आव्हान देणारे नवे काही रोग उत्पन्न होत आहेत. त्यावर उपचार करायचे म्हटले तर ते खर्चिक ठरतात. मुळातच आधुनिक वैद्यक सेवा किचकट आणि तितकीच महागडी बनलेली आहे. भारतीय आरोग्य सेवेबाबत म्हणाल, तर येथील आरोग्यसेवा ही शहरी लोकांच्या दृष्टीने बनवण्यात आलेली असून सर्वसामान्य ग्रामीण जनतेला ती पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. सुमारे 80 टक्के आरोग्यसेवा महानगर, शहरांमधूनच दिल्या जातात. ग्रामीण आणि शहरी अशी आरोग्य सेवांची झालेली असमतोलीत व्यवस्था खरे तर संशोधनाचा विषय आहे. असो; पण शेवटी जनतेच्या आरोग्याचा मूलभूत हक्क आपल्या घटनेने मान्य केलेला आहे.

कल्याणकारी राष्ट्राच्या संकल्पनेत आरोग्यसेवा पुरवणे, आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न करणे याचे महत्त्व ओळखूनच आपले सरकारही आरोग्य सेवा पुरवण्याचा प्रयत्न करत आले; पण लोकसंख्येच्या तुलनेत या सेवा अपुर्‍या पडतात. त्यात ग्रामीण आरोग्याची हेळसांड ठरलेलीच असते. ही हेळसांड थांबवावी म्हणूनच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय स्थापन करण्याची नवी घोषणा केली आहे. तेव्हा पुढच्या काळात ग्रामीण भागातही आरोग्य सेवा उपलब्ध होतील, अशी आशा करूयात.

आरोग्य सेवेचे हे कार्य व्यापक आहे. त्यामुळेच या सहकारी रुग्णालयाच्या उभारणीच्या कार्यात समाजातील दानशूर व्यक्ती, समूह, विविध संघटना, सहकारी संस्था, संस्था सभासद, चॅरिटेबल संस्था-सभासद तसेच वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, तंत्रज्ञ, परिचारिका व अनुषंगिक कर्मचारी यांनी या सहकारी रुग्णालयाचा सभासद होऊन भागभांडवल व अर्थसाह्य उभारण्यासाठी सहकार्य करावे.

chavan-sir-vice-president-of-adarsh-sahakari-rughnalay

डॉ. प्रशांत चव्हाण पाटील


सभासद झालेल्या व्यक्तींना उपचारादरम्यान रोगनिदान व उपचार यावर झालेल्या खर्चात किमान 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तरी या कार्यात सर्वांनी सर्वोतोपरी मदत करावी, अशी विनंती करतो. धन्यवाद!

आदर्श उद्योग समूह, औरंगाबाद

TOP