Adarsh Sahakari Rughnalay Aurangabad Best Hospital

आमचे विभाग

या ठिकाणी वैद्यकशास्त्र, शल्यचिकित्सा, अस्थिरोग विकार व शस्त्रक्रिया, अपघात ट्रॉमा केअर, बालरोग, स्त्रीरोग विभाग, कान-नाक-घसा, डोळ्यांचे विकार, दंत व्यंगोपचार केले जातील. तर गॅस्ट्रोस्कोपी, इंडोस्कापी, एक्स-रे, स्क्रीनिंग मशीन, सोनोग्राफी, अँजिओग्राफी, कार्डिओग्राफी, एमआरआय, सीटी स्कॅन, पॅथॉलॉजी आदी सुविधा उपलब्ध असतील. आदर्श रुग्णालयाकडे अति विशिष्ट सेवा प्रदान करण्यासाठी पायाभूत सुविधा आणि अत्याधुनिक उपकरणे आहेत.

आदर्श रुग्णालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवून आम्ही सामाजिक आरोग्य समृद्ध करीत आहोत. गरीब आणि गरजू लोकांना विविध आरोग्यविषयक शासकीय योजनांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सेवा देत आहोत. आज आदर्श रुग्णालय सर्वोत्तम आणि दर्जेदार आरोग्य काळजीसह शिक्षण आणि संशोधनासाठीचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून नावारूपास येत आहे.

उपचार व सल्ला विभाग

हृदयरोग, मधुमेह, फुप्फुसाचे आजार, दमा, मेंदूवरील उपचार, किडनीशी संबंधित उपचार व डायलिसीस युनिट.

संपूर्ण आरोग्य तपासणी, मधुमेह व रक्तदाबाचे संपूर्ण निदान, त्यावरील उपचार व सल्ला, तसेच अतिदक्षता विभाग.

01
topmost-hospital-in-aurangabad-adarsh
best-hospital-adarsh-hospital-with-operation-and-surgery-department

शल्यचिकित्सा (सर्जरी) विभाग

आदर्श रुग्णालयात सर्वप्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी अत्याधुनिक सुविधा आहेत. कॅन्सर निदान व शस्त्रक्रिया, पॅडिऍट्रिक सर्जरी. व्ही.डी.ओ. एन्डोस्कोपी, गॅस्ट्रोस्कोपी, ब्रॉन्कोस्कोपी, कोलोनोस्कोपी, ई.आर.सी.पी., न्यूरोसर्जरी.

02

एक्सरे रूम

रुग्णालयात अद्ययावत एक्सरे रूम आहे. त्यामुळे अचूक रोगनिदान आणि त्यावरील उपचार करण्यास मदत होते.

03
best-treatment-in-adarsh-hospital
aurangabad-best-hospital-adarsh-hospital-accident-department

अपघात (ट्रॉमा केअर) विभाग

रुग्णालयात आधुनिक अपघात (ट्रॉमा केअर) विभाग रुग्णांसाठी सज्ज आहे. या विभागात विषबाधा, सर्पदंशाचे रुग्ण, तसेच अ‍ॅक्सिडेंटमधील जखमींवर उपचार केले जातात.

04

दंतचिकित्सक

या विभागात दातांच्या आरोग्याची देखभाल केली जाते. दातांविषयीच्या अनेक तक्रारींनी नागरिक त्रस्त होऊन जातात. अशा वेळी दंतचिकित्सा विभागात निरनिराळ्या पद्धतीने उपचार रुग्णांची त्रासातून मुक्तता करण्यात येते.

05
best-hospital-in-aurangabad-adarsh-rugnalay-dentist
pathology-in-adarsh-sahakari-hospital-women-and-maternity-department

स्त्री व प्रसूती विभाग

स्त्री आरोग्याशी समर्पित हा विभाग आहे. नॉर्मल डिलिव्हरी, सिझेरियन शस्त्रकिया, गर्भपिशवीचे ऑपरेशन, मासिक पाळीनंतरच्या समस्या व निवारण, सुसज्ज प्रसूतिगृह, स्त्रियांच्या सर्व आजारांचे निदान व उपचार या विभागांतर्गत करण्यात येतात.

06

बालरोग विभाग

नवजात शिशू अतिदक्षता विभाग, बालरोग अतिदक्षता विभाग, बाल शल्यचिकित्सा, सुसज्ज लसीकरण सुविधा, बालदमा उपचार सुविधा, बाल अस्थिरोग चिकित्सा सुविधा, बाल मूत्रपिंड (किडनी) विकारांवर या विभागात उपचार केले जातात.

07
adarsh-hospital-aurangabad-children-department
TOP