Adarsh Sahakari Rughnalay Aurangabad Best Hospital

सहकार संजीवनी योजना

(फक्त सभासदांसाठी)

आंतररुग्ण सेवा

30% सवलत


सहकार संजीवनी योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना ३० टक्के सवलत दिली जाते. आंतररुग्ण कालावधीत लागणारी औषधे आणि वैद्यकीय शुल्क वगळून या सवलतीचा लाभ घेता येईल.

बाह्यरुग्ण तज्ज्ञ सल्ला, तपासण्या

30% सवलत


बाह्यरुग्ण सल्ला व तपासण्यांमध्ये रुग्णांना ३० टक्के सवलत दिली जाते. सहकार संजीवनी योजनेअंतर्गत रुग्णांना या सवलतीचा लाभ घेता येईल.

बाह्यरुग्ण तापसण्या

30% सवलत


रुग्णांना बाह्यरुग्ण तपासण्यांमध्ये ३० टक्के सवलत देण्यात येते. याअंतर्गत प्लेन सीटी स्कॅन, एमआरआय, क्ष-किरण, सामान्य प्रयोगशाळा चाचण्यांसाठी ही सवलत लागू असेल.

बाह्यरुग्ण क्रियावली

30% सवलत


बाह्यरुग्ण क्रियावलीअंतर्गत रुग्णांना ३० टक्के सवलत मिळू शकेल. गॅस्ट्रोस्कोपी, इंडोस्कोपी आदी उपचारांसाठी त्याचा लाभ होईल.

स्पेशल पॅथॉलॉजी चाचण्या

20% सवलत


स्पेशल पॅथॉलॉजी चाचण्यांसाठी रुग्णांना २० टक्के सवलत देण्यात येईल. रुग्णालयात आल्यानंतर रुग्णांना कराव्या लागणाऱ्या स्पेशल पॅथॉलॉजी चाचण्यांसाठी ही सवलत लागू असेल.

दंतचिकित्सा

25% सवलत


दंतचिकित्सा विभागात येणाऱ्या रुग्णांना २५ टक्के सवलत देण्यात येईल.

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सोसायटी
(महाराष्ट्र सरकार उपक्रम)

[पिवळी आणि केशरी शिधापत्रिका धारकासाठी]

सामान्य शस्त्रक्रिया (जनरल सर्जरी)

हर्निया, अन्ननलिकेशी संबंधित शस्त्रक्रिया, लहान आतडे व मोठे आतडे यांच्याशी संबंधित शस्त्रक्रिया, यकृत, पित्ताशयासंबंधी शस्त्रक्रिया, अंडाशयातून पाणी काढणे, अंडाशयाला सूज येणे, अंडाशयातील गाठ काढणे, स्तनांसंबंधित गाठीच्या शस्त्रक्रिया, फोडा-फुंसी ड्रेनेजद्वारे काढणे, ओठांवरील शस्त्रक्रिया, मानेवरील किंवा काखेतील गाठ काढणे, गुडघ्यातील गाठ काढणे आदींचा यात समावेश आहे.

अतिदक्षता विभाग

न्युमोनिया/अतिगंभीर न्युमोनिया, दमा, विषबाधा, सर्पदंश, विंचूदंश, कुत्रा चावणे, कृत्रिम श्वसनयंत्रासह (व्हेंटिलेटर), उच्च रक्तदाब, मधुमेह व मधुमेहापासून होणारे आजार, रक्ताची कमतरता व त्यापासून होणारे आजार, पक्षाघात (लकवा, अर्धांगवायू), मेंदुज्वर, डेंगू, यकृताचे आजार (कावीळ).

लहान मुलांचे आजार व शस्त्रक्रिया

मूत्राशय व किडनीच्या शस्त्रक्रिया, मुलांच्या लघवीच्या जागेत अडथळा असणे, लघवीची जागा योग्य ठिकाणी नसणे, मुलांमधील अंडाशयातील गाठी, लहान मुलांच्या (हर्निया) पोटातील आतडे जांघेमध्ये येणे.

पोटाचे विकार व शस्त्रक्रिया

पोटातील आतड्याला पीळ पडणे अथवा अडथळा असणे, आतडीत आतडी घुसून अडथळा तयार होणे, आतडीला छिद्र पडणे, पित्तनलिकेवरील गाठी/सूज.

अस्थिरोग व शस्त्रक्रिया विभाग

मणक्याची शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याची शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या फाटलेल्या नसेची शस्त्रक्रिया, माकडहाडाशी संबंधित शस्त्रक्रिया, कृत्रिम खुबा रोपण, बोन ग्राफ्टिंग शस्त्रक्रिया, सॉफ्ट टिशू रिकन्स्ट्रक्शन.

यूरोलॉजी मूत्रशास्त्र

किडनी स्टोनशी संबंधित शस्त्रक्रिया, किडनीची दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, प्रोटेस्ट ग्रंथीवरील उपचार व शस्त्रक्रिया.

TOP